किल्ले रोहिलागड पायथ्याचे गाव: रोहिलागड प्रकार:गिरीदुर्ग उंची:७६० मी. पूर्ण पत्ता: रोहिलागड ता.अंबड जि.जालना ४३११२१ गावाची लोकसंख्या:५ हजार कसे याल? जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने औरंगाबादकडून येत असाल तर औरंगाबाद-बीड महामार्गावर रोहिलागड फाट्यातून आत ५ किमी रोहिलागड गाव आहे. जालना कडून येत असाल तर जालना-अंबड महामार्गावर हॉटेल सुखसागर पाशी रोहिलागड फाटा आहे तेथून १६ किमी रोहिलागड आहे. रोहिलागडला बसने सुद्धा येत येते.बसचे वेळापत्रक खाली दिले आहे. रोहिलागड हे यादवकालीन बाजारपेठेचे व तीर्थक्षेत्राचे केंद्र होते. अंबड ते देवगिरीला जोडणाऱ्या मार्गावर रोहीलागडची रक्षण म्हणून निर्मिती केली गेली असावी. रोहिलागड किल्ला टेकडीवजा डोंगरावर आहे. किल्ल्यावर गावातून आणि बायपास रस्त्याने फिरंगी देवी मंदिराशेजारून जाता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी कोठूनही चढाई करता येते. गावातून सुरुवात केल्यावर १० मी. आपण लेणी शेजारी पोहोचतो.लेणी समोर सपाट जागा असल्याने गावकर्यांनी तेथे शेती करण्यास सुरुवात केली आहे. तेथून लेणीत शिरल्यावर प्रचंड मोठा हॉल दिसतो.लेणीत एकूण ११ खांब आहेत. तसेच ३ देवळ्या कोरलेल्या आहेत.पैकी एका देवळीत मूर्ती आहे ती मूर्ती कोणत्या देवतेची आहे अजून कळले नाही.लेणीत एक भुयार आहे.ते दौलताबादला जाते असे गावकरी सांगतात.त्याबाबत आख्यायिका अशी कि एक मेंढपाळ मेंढ्या चारत असताना तेथे लांडगा आला ते पाहून त्याने मेंढया लेणीत घुसवल्या.त्यापैकी बर्याच मेंढ्या त्या भुयारात शिरल्या.जस जस मेंढ्या चालत गेल्या तस मरत गेल्या.शेवटी एक मेंढी दौलताबाद येथील एका तोफेपाशी पोहचली पुढे त्या तोफेचे नाव मेंढीतोफ असे ठेवले.असे गावकरी सांगतात. त्या लेणी शेजारीच अजून एक लेणी आहे.ती लेणी बुजलेली असल्याने नीट पाहता येत नाही.परंतु त्या लेणीमध्ये खूप मोठा हॉल आहे असे एका सुळ्क्यातून दिसते. पुढे अवघड कडा पार केल्यावर थोडे तटबंदीचे अवशेष दिसतात.तेथून वर गेल्यावर भगवा झेंडा लागतो. झेन्द्यापाशी गेल्यावर चढाई पूर्ण होते. झेण्ड्यापासून गडावरील संपूर्ण मैदान दिसते.तेथून पुढे गडावरील प्रशस्त वाड्याचे अवशेष दिसतात.त्याबाबत गावकरी असे सांगतात कि गडावर खूप मोठा वाडा होता.परंतु गावकर्यांनी त्या वाड्याचे दगड काढून घेऊन पुढे मंदिरे,घरे,घराचे जोते बांधले आहे.आज पण गावातील प्रत्येक घराला गडावरील दगड आहे. त्यापाशीच एक पाण्याच्या टाकीचे अवशेष दिसतात.ती सद्स्तितीला बुजलेली आहे. त्या समोरच एक रांजण दिसतो.हा रांजण अगदी हुबेहूब नानेघाटातील दगडी रांजनासारखा आहे.देवगिरी-अंबड या मार्गाचा वापर करणाऱ्या व्यापारांकडून त्याकाळी कर म्हणून घेतलेले नाणे किवा रक्कम या रांजणात गोळा केली जात असावी. त्या शेजारीच गडावरील एकमेव बुरुज दिसतो.त्या बुरुजाचे नाव आग्नेय बुरुज होते.या भागात हा डोंगर सर्वात उंच असल्याने या बुरुजावरून आसपासचा संपूर्ण परिसर दिसतो.पूर्वेकडे अंबड,अग्नेयकडे जालना आणि पश्चिमेकडे औरंगाबादचा काही भाग अस संपूर्ण दिसतात.तेथून उत्तरेकडे खाली उतरून गेल्यावर एक लेणी लागते.त्या लेणीतील खांब पडलेल्या अवस्थेत आहे.त्या लेणीत एक भुयार आहे.ते वर वाड्याकडे जाते. तेथून बुरुजापाशी आल्यावर पुढे पाण्यासाठी खदान खोदलेली आहे.पावसाळ्यात ती खदान पूर्ण भरलेली असते.त्यामध्ये मुले पोहण्याचा आनंद लुटतात. तेथून जवळच एक खोल भाग दिसतो.त्या गड्ड्यात लेणी आहे.लेणीत शिरल्यावर हॉल दिसतो.ती थोडी बुजलेली आहे.त्या लेणीत एकूण चार भुयार आहे.त्या भुयार थोडे पुढे बुजलेले आहे.त्या लेणी शेजारीच पाण्याचे कोरडे टाके आहे.तेथून वर गेल्यावर पुढे तटबंदी आहे.ती चांगल्या स्थितीत आहे.तेथुन खाली उतरल्यावर पायवाटेने जात असताना एक पाण्याचे कोरडे टाके लागते. शेवटी पायवाट गावात घेऊन जाते.गावतील मारुती मंदिरापाशी अनेक सातवाहन काळातील देवतेचे शिल्पे आहे. तेथे एक गोल आकाराचा दगड आहे.तो दगड गावातील मल्ल व्यायामासाठी वापरत असत.गावतील प्रत्येक मंदिरापाशी अनेक मुर्त्या व शिल्पे आहे.गावात अनेक विरंगळ सापडत असतात.गावात अनेक वेशी होत्या.त्यापैकी जशी त्या काळात होती.तशी फक्त एक उरलेली आहे.ती सुस्थितीत आहे. ते वास्तुशास्त्राचे दिव्य काम आहे.गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.पण या वारसाचे जतन होणे महत्वाचे आहे.

I BUILT MY SITE FOR FREE USING