एक दुर्लक्षित गड रोहिला गड पर्यटन करायला सर्वांना आवडतं तसा तो सर्वांचा आवडता छंदच झाला आहे प्रत्येक जण आपापल्या आवडी नुसार पर्यटन स्थळांची निवड करतो परंतु ऐतिहासिक वास्तू वस्तू यांच्या पर्यटनातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो काही वास्तूची निर्मिती अफलातून झालेली दिसते आपल्या पूर्वजांनी घडवलेल्या इतिहासाचे दर्शन आपल्याला या वास्तू वस्तू पाहिल्याने होते कालौघात नष्ट होत चाललेल्या या वास्तूचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे हा वारसा येणाऱ्या पिढीला पाहता आला पाहिजे त्याचा अभ्यास करता आला पाहिजे प्रत्येक गावाला एक इतिहास असतो तो शोधला तर सापडतो आपल्या परिसरात अशा काही ऐतिहासिक वास्तू,वस्तू असतात कि ज्या पासून सर्वजण अनभिज्ञ असतात कदाचित इतिहासानेही त्याची दखल घेतलेली नसते अशा ज्ञात अज्ञात इतिहासाचा शोध घेऊन तो प्रकाशात आणणे आवश्यक आहे गेल्या वीस वर्षांपासून आम्ही अनेक किल्ले समाध्या वाडे लेण्या इ ऐतिहासिक वास्तू पाहिल्या त्याचा अभ्यास केला अशाच एका दिवाळीच्या सुट्ट्यात गावाकडे असतांना मित्राबरोबर ऐतिहासिक गोष्टीवर गप्पा गोष्टी करताना लक्षात आलं कि आपण आपल्या भोवतालचा इतिहास कधीच जाणून घेतला नाही मग आठवलं शेजारच्या गावात बाजाराच्या दिवशी जायचो त्या गावाशेजारील डोंगरात एक लेणी आहे ती दुरून पाहायचो त्यावर चर्चा सुरू झाली आणि मग काय उद्या तेथे प्रत्येक्ष जायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी मित्रांसह त्या गावात गेलो ते गाव रोहिलागड ता अंबड जि जालना औरंगाबाद पासून ४५ किमी अंतर असून औरंगाबाद ते बीड हायवे पासून १० कि मी आत मध्ये आहे या गावात एक कॉलेजचा मित्र भेटला हे त्याचे मूळ गाव होते त्याच्या कडून थोडी माहिती घेतली त्याने एक वाटाड्या सोबत दिला त्याला घेऊन निघालो गावाला लागूनच असलेल्या डोंगरावर चढायला सुरुवात झाली डोंगराची उंची बेताचीच असून तो आकाराने लहान आहे अर्धे अंतर चढून पार केले थोडे माळरान लागले त्यावर पिकं डोलत होती समोरच एक मोठी खडकात कोरलेली लेणी दिसली तिच्या प्रवेश द्वारा समोर उंच उंच झाडे झुडपे उगवलेली होती त्यातून वाट काढत आम्ही लेणीत गेलो लेणी आकाराने बरीच मोठी असून ती अकरा स्तंभावर उभी आहे सर्व स्तंभ सारख्याच आकाराचे असून तळात ते चौकोनी मध्येभागी षट्कोनी तर वरचा भाग गोलाकार कोरलेला आहे सर्व स्तंभ आडवे उभे एका रेषेत दिसतात लेणीत कुठेच मूर्ती लेख किंवा इतर नक्षीकाम केलेले नाही लेणीत एका बाजूच्या भिंतीत तीन लहान मोठ्या आकाराच्या देवळ्या कोरलेल्या असून एका लहान देवळीत मागच्या बाजूस मूर्ती सारखा आकार असलेल्या ठिकाणी सेंदूर लावलेला आहे स्थानिक लोक याची मारुती म्हणून पूजा करतात लेणीच्या एका बाजूला तळामध्ये एक आयात आकारा चा कोरीव बोगदा दिसतो असे सांगतात की हा एक पायऱ्या असलेला भुयारी मार्ग आहे तो आज पूर्ण पने बुजून टाकलेला आहे याबाबतीत एक अख्यायिका ऐकायला मिळाली ती अशी एका मेंढपाळाच्या सर्व मेंढ्या या भुयारात गेल्या त्यातील एक मेंढी दौलताबाद किल्ल्यात निघाली होती असे सांगतात या लेणीचे काम अर्धवट झालेले दिसते त्याच्या अनेक खाणा खुणा आतमध्ये आहेत लेणी ज्या खडकात खोदली तो ठिसूळ आहे असे दिसते लेणीतील काही स्तंभ तुटलेले दिसतात लेणी बघून झाल्यावर डोंगराच्या माथ्या जवळ आलो एक तटबंदी दिसली तीचे चिरे घडीव होते परंतु ठिसूळ दगडाचे दिसले बांधकामासाठी चुना वापरलेला दिसतो या तट भिंतीपासून जवळच ऐन माथ्यावर एक मोठा खड्डा दिसला हे काय असावे म्हणून ते पाहण्यासाठी जवळ गेलो तर त्यात मोठं मोठी झाडे झुडपे उगवलेली दिसली त्यामुळे नीट दिसेना मग वाटाड्याने सांगितले तये भुयार आहे आम्ही खाली उतरण्यासाठी थोडा रस्ता तयार करून कसेतरी आत उतरलो एका बाजूला अरुंद रस्ता दिसला आत डोकावून पाहिलं तर स्तंभ असलेलं भुयार दिसलं माणसाला सहज चालता येईल एवढी उंची भरपूर रुंद आकार असून लांबी खूप असावी असे दिसते त्याचे स्तंभ गोलाकार असून ते ओबड धोबीड कोरलेले आहेत हा एक प्रकारचा तळ मजला वाटला बॅटरी नसल्यामुळे आम्ही आत जाण्याचे धाडस केले नाही हे भुयार किती लांब आहे हे कुणाला सांगता आले नाही वर आल्यावर बाजूलाच एक मोठे खडका तील तळे दिसले त्यात पाणी होते यातील दगडांचा वापर बांध कामासाठी केला असावा डोंगर कड्याच्या बाजूला तट भिंतीला लागून दोन उंच टेकाड दिसली त्या पैकी एका ठिकाणी खोदकाम केलेले दिसले ते एका घराचे अवशेष असून त्याच्या भिंती रुंद आहेत त्या दगडी फाडी मध्ये चिखल मातीत बांधलेल्या आहेत असे दिसले याच घराच्या मागील बाजूने खाली उतरून गेल्यास एक लेणी दिसते तिच्या प्रवेशद्वारा समोर झाडे झुडपे असल्यामुळे आत गेलो नाही येथे ही एक भुयार आहे असे सांगतात एका मोकळ्या जागी अखंड दगडात कोरलेला गोल आकाराचा अगदी माठा सारखा दिसणारा दगडी रांजण आहे तो ताळामध्ये फुटलेला दिसतो असे अनेक राजन गावात पहायला मिळतात असे सांगतात की लोकांनी ते डोगरावरून खाली आणले आहेत बाजूला एक चौकोनी आकाराच्या प्रशस्त वाड्याच्या भिंतीचा पाया दिसतो आजू बाजूला अनेक छोट्या छोट्या घरांच्या पाया चे आवशेस दिसतात भाजलेल्या विटांचे ही अवशेष येथे दिसतात या डोंगराला चोहो बाजूने तटबंदी होती असे दिसते तिचा पाय दगडांनी भरलेला दिसतो म्हणजे चोहो बाजूनी मजबूत तट बंदी होती हे यावरून दिसते ती दगडी चिरे चिखल मातीत बांधली असावी डोंगराच्या पश्चिमेस एका खाली एक असे तीन टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर पांढरी मातीचे थर व ओबड धोबड दगड दिसतात येथून डोंगरावर चढणे अत्यंत सोपे आहे म्हणून येथे दगड मातीत बांधलेला बुरुज असावा त्याच्या पायाचे अवशेष दिसतात स्थानिक लोक असे सांगतात की येथे टेहाळणी दुरुज होता या गावातील लोकांनी या डोंगरावरील दगडी चिरे खाली आणून घरांची जोती बांधली असे लोक सांगतात गावात वेशी जवळ एका प्राचीन मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात गावातील मारुती मंदिरा समोर एक मोठी दगडी गोलाकार गूळगुळीत गोटी आहे एके काळी गावातील मल्ल तिला उचलत असत देवीच्या मंदिरा जवळ पाचीन मंदिराचे दगडी स्तंभ पडलेले दिसतात तर काही स्तंभ मातीत गाडले गेले आहेत या गावात कुठे तरी प्राचीन मंदिर असावे जे कालौघात नष्ट झाले असावे असे वाटते स्तंभावरील व चिऱ्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे एका स्तंभावर दोन हत्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पुढचे पाय वर करून दोघांनी मान फिरवुन सोंडी एकमेकात अडकवल्या असून पाठीवर कलश आहे त्यावर श्रीफळआहे दुसरे असे की,एक आई आपल्या बाळाला मांडीवर बसवुन स्तनपान करताना दिसते तर तिसरी मूर्ती अशी दिसते की महादेव मंदिराच्या गर्भ गृहातील प्रवेश द्वाराच्या खालच्या दोन्ही बाजूस जसे व्याल असतात तसाच एक व्याल आहे इतर हि बरेच नक्षीकाम केलेले आहे ह्या सर्व कोरीव मूर्ती एकाच स्तंभावर असून तो स्तंभ चौकोनी षट्कोनी व गोलाकार आहे बरेच चिरे मारुती मंदिर व इतर मंदिरांना लावलेली दिसली हे मंदिर नेमके कोणत्या कालखंडात निर्माण झाले असावे असा प्रश्न पडतो? कोणत्या देवतेचे मंदिर होते हे सांगणे कठीण आहे इतरत्र अनेक अवशेष पडलेले दिसतात गावाला जे रोहिलागड नाव आहे त्याच्या विषयी असे सांगितले जाते की या डोंगरा वरील गडाचे बांधकाम अर्धवट राहिले म्हणून त्यास राहिलेलागड म्हणजेच रोहिलागड असे म्हणतात तर दुसरे असे की या गावात पूर्वी रोहिले लोक राहत होते म्हणून त्यास रोहिलागड नाव पडले असेही सांगितले जाते या डोंगराच्या आजू बाजूला अनेक लहान मोठया टेकड्या आहेत थोड्याच अंतरावर जांबुवंत गड आहे येथे जांबुवंतांचे मंदिर आहे मी या ठिकाणा विषयी अधिक माहिती मिळवण्या साठी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या कार्या लयात गेलो मी जे पाहिलं ते त्यांना सांगितलं त्यांनाही या विषयी काही माहिती सांगता आली नाही मग त्यांनी जुने औरंगाबाद जिल्हा ग्याझेटिअर काढले त्यातील रोहिलागड गावाच्या नोंदी नुसार जालन्याच्या डोंगर रांगेतील एका डोंगरात लेणी व किल्ल्याचे अवशेष दिसतात एवढीच नोंद मिळाली एकंदरीत सर्व निरीक्षणावरून असे वाटते की या गावात कोणत्यातरी देवतेचे दगडी घडीव चिऱ्याचे प्राचीन मंदिर असावे जे नष्ट झाले आहे डोगरावरावरील किल्ल्याच्या अवशेषां वरून व रचने वरून वाटते की येथे गढीवजा किल्ला असावा त्याचे बांधकाम मध्ययुगीन काळात झाले असावे असे प्रथम दर्शी दिसते दोन्ही लेण्यातीळ भुयारी मार्ग व गडाच्या माळराणा वरील तळातील भुयारी मार्ग हे एकमेकांना जोडलेले असावे असा अंदाज आहे त्याचा वापर संकट कालीन परिस्थिती त केला जात असावा अशा या दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू कालौघात नष्ट होत आहेत या वास्तू इतिहासाच्या खऱ्या अर्थाने साक्षीदार आहेत वास्तू पुन्हा निर्माण होणे कदापि शक्य नाही किमान त्या आहे त्या स्थितीत टिकल्या पाहिजेत त्याच जतन झालं पाहिजे हि अपेक्षा आहे

I BUILT MY SITE FOR FREE USING